Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एकनाथराव खडसेंच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला धर्मध्वजाचे ध्वजारोहण

एकनाथराव खडसेंच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला धर्मध्वजाचे ध्वजारोहण

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री तथा ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृतमहोत्सवी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला रविवारी, २३ ऑगस्ट रोजी जुनी कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.

धार्मिक वातावरणात झालेल्या धर्मध्वजाच्या ध्वजारोहणाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

श्री संत मुक्ताई मंदिर येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धर्मध्वजाच्या ध्वजारोहणानंतर अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिकृत सुरुवात झाली. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून परिसरात कीर्तन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी बांधव, कीर्तनकार आणि भाविकांना एकत्र येण्याची संधी मिळणार असून, संपूर्ण सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर अमृतमहोत्सवाच्या पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि भाविकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यास ह.भ.प. रविंद्र हरणे महाराज, ह.भ.प. भरत महाराज बेळीकर, ह.भ.प. रमेश महाराज आडविहिरकर, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील, ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्यासह परिसरातील विविध ह.भ.प. कीर्तनकार, वारकरी बांधव, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

यावेळी अमृत समितीचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अमृत समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे, प्रमोद पाटील, डॉ. जगदीश पाटील, कैलास बापू सूर्यवंशी, संजय पाटील, ॲड. रोहिणीताई खडसे, दिनेश पाटील, ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, यू. डी. पाटील, नारायण चौधरी, विलास धायडे, संदीप देशमुख, राजू माळी, राजेंद्र चौधरी, नागो पाटील, साहेबराव पाटील, प्रशांत पाटील, रामदास पाटील, डॉ. बी. सी. महाजन, माणिकराव पाटील, विकास पाटील, हरलाल राठोड, नंदकिशोर हिरोळे, सुनील पाटील, प्रवीण कांडेलकर, शाम सोनोने, निलेश पाटील, सतीश पाटील, अजयसिंग पाटील, नीलेश पाटील, अनिल चौधरी, राजेंद्र पाटील, ललित महाजन, बबलू सापधरे, मनोज तळेले, पंकज सरोदे, सचिन बोरोले, बाळा चिंचोले, संदीप जावळे, गणेश देवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या धार्मिक उपक्रमामुळे जुनी कोथळी आणि परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मध्वजाच्या ध्वजारोहणाने सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अमृतमहोत्सवी सोहळा पुढील काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय होणार आहे. आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त जुनी कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिरात धर्मध्वजाचे ध्वजारोहण करून अमृतमहोत्सवी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित भाविक, वारकरी आणि मान्यवरांमुळे सोहळ्याला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News