Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगाव जिल्हा परिषदेत ३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

जळगाव जिल्हा परिषदेत ३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

Live Trends News 3 weeks ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून समुपदेशन पद्धतीने ३९ शिक्षकांना विविध शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांचे समतोल वितरण होऊन शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या उपशिक्षक, पदवीधर शिक्षक तसेच मुख्याध्यापक अशा एकूण ३९ शिक्षकांचे समुपदेशन गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी पार पडले. जिल्हा परिषदेतल्या शाहू महाराज सभागृहात आयोजित या प्रक्रियेला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची उपस्थिती लाभली. समुपदेशनादरम्यान संबंधित शिक्षकांना तालुकानिहाय रिक्त पदांची सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्यांच्या पसंतीनुसार त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली.

या समायोजन प्रक्रियेमुळे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती, त्या शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जास्त होती, तेथील अतिरिक्त भार कमी होऊन शिक्षण व्यवस्थेत समतोल साधला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास शिक्षण अधिकारी निलेश पाटील, उपशिक्षण अधिकारी विजय सरोदे, नरेंद्र चौधरी तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आल्याने शिक्षकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News