Thursday, 21 Jan, 9.04 am Live Trends News

होम
खडकदेवळा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कावल्यातून पाण्याची नासाडी (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । खडकदेवळा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाने कानाडोळा करत दुर्लक्ष केले जात असल्याने सदरची होणारी पाण्याची नासाडी त्वरीत थांबवावी, अशी मागणी खडकदेवळा खु ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पाचोरा तालुक्यातील हिवरा माध्यम प्रकल्पाच्या कॅनलच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. सोडण्यात आलेले पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असून गेल्या २० ते २२ दिवसांपासून सदर पाणी हे कालव्यातून सुरुच होते. त्यामुळे खडकदेवळा खु" येथील शेतकर्‍यांनी लाखो लिटर होणारी पाण्याची नासांडी थांबविण्यासाठी हिवरा माध्यम प्रकल्पाच्या कर्मचारी व अधिकारी वर्ग कडे याबाबत तोंडी तक्रार केली आहे. परंतु याकडे संबंधीत अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर हिवरा माध्यम प्रकल्पाच्या कॅनलच्या उजव्या कालव्याचे गेटच नादुरुस्त असल्याचे समजते. तसेच या कॅनलच्या आजुबाजुला मोठ - मोठी झाडे झुडपे असल्याने तेथील साफसफाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांमार्फत केली जात आहे.

Prev Post

अनुकंपधारकांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण ! (व्हिडीओ)

Next Post

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News
Top