Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश; सलीम इनामदार बनले जळगाव महानगर अध्यक्ष

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश; सलीम इनामदार बनले जळगाव महानगर अध्यक्ष

Live Trends News 2 weeks ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजवादी पक्षाच्या जळगाव जिल्हा महानगर अध्यक्षपदी सलीम इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जळगाव महानगराची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीमुळे जळगाव शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई येथील समाजवादी पक्षाच्या राज्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या हस्ते सलीम इनामदार यांना आदरपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्य प्रधान सचिव परवेझ सिद्दीकी, राज्य निरीक्षक तथा धुळे महानगर जिल्हा अध्यक्ष, गुड्डू यांचे मेहुणे तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र सचिव अखिल भाई, राज्य अधिकारी रईस कुरेशी, इम्रान साहिल, सलीम मन्यार यांच्यासह समाजवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सलीम इनामदार यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सलीम इनामदार यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्या समाजातील संपर्कामुळे आणि कार्यामुळे त्यांना महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. समाजवादी पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजासह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सलीम इनामदार यांनी सांगितले. पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सलीम इनामदार यांच्या नियुक्तीची माहिती मिळताच जळगाव शहरात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजवादी पक्षाला जळगाव शहरात नवीन नेतृत्व मिळाल्याने आगामी काळात पक्ष संघटन विस्ताराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलीम इनामदार यांच्या नियुक्तीमुळे समाजवादी पक्षाच्या जळगाव महानगर संघटनेला नवी दिशा मिळणार असून आगामी काळात शहरातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर पक्ष अधिक सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News