Dailyhunt
महापौरांच्या पतीचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेपाचा आरोप; मनसेची तक्रार

महापौरांच्या पतीचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेपाचा आरोप; मनसेची तक्रार

Live Trends News 1 week ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतील कामकाजात महापौरांच्या पतीकडून होत असलेल्या कथित हस्तक्षेपाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गंभीर तक्रार करण्यात आली आहे.

यासंदर्भात मनसे शहराध्यक्ष विनोद शंकर शिंदे यांनी महापालिकेचे उपायुक्त यांना निवेदन सादर केले असून त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेतील विविध कामांमध्ये महापौर दिपमाला काळे यांच्या पतीकडून सातत्याने थेट हस्तक्षेप होत असून, अधिकाऱ्यांना आदेश देणे, बैठकीत हस्तक्षेप करणे तसेच कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यपद्धतीला बाधा आणणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महापौर पद हे कायद्याने निश्चित अधिकार आणि कर्तव्यांसह येते. त्यामुळे केवळ निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनाच कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने प्रशासनात हस्तक्षेप करणे हे बेकायदेशीर असून पारदर्शकतेला धक्का देणारे आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

मनसेने प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केवळ अधिकृत आदेशांचेच पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News