Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मनपात महापौरांचा मोठा निर्णय: स्थायी समितीचे सर्व निर्णय आता महासभेच्या पटलावर

मनपात महापौरांचा मोठा निर्णय: स्थायी समितीचे सर्व निर्णय आता महासभेच्या पटलावर

Live Trends News 2 weeks ago

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या कारभारात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महापौर दीपमाला काळे यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेतील विद्यमान स्थायी समितीत घेतलेले विषय आणि निर्णयांची संपूर्ण माहिती महासभेच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश त्यांनी नगरसचिवांना पत्राद्वारे दिले आहेत.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या कारभारात दिवसेंदिवस पारदर्शकता यावी, या उद्देशाने महापौरांनी नगरसचिवांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, विद्यमान स्थितीत अस्तित्वात आलेल्या स्थायी समितीत आजपर्यंत झालेले कामकाज, नियमितपणे सादर केले जाणारे विषय आणि त्यावर घेण्यात आलेले निर्णय यांची प्रत महासभेच्या अवलोकनासाठी वेळोवेळी सादर करण्यात यावी.

प्रत्येक महासभेत त्या-त्या मागील कालावधीत स्थायी समितीमध्ये झालेले सर्व कामकाज, विषय व निर्णयांबाबतची संपूर्ण माहिती सर्व नगरसेवकांना अवगत असणे अत्यंत गरजेचे व क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ही सर्व माहिती महासभेच्या अजेंड्यासोबतच सर्व नगरसेवकांना उपलब्ध करून देण्यात यावी, असे महापौरांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

या निर्णयामुळे महापालिकेतील सर्व लोकप्रतिनिधींना स्थायी समितीच्या कामकाजाची माहिती वेळेवर आणि स्पष्टपणे उपलब्ध होणार असून, जळगाव शहर महानगरपालिकेच्या एकूणच कारभारात अधिक पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. महापौरांनी यासंदर्भात नगरसचिव कार्यालयाने तत्काळ कार्यवाही करावी आणि या कामात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News