Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोबाईलवर 'असे' डाउनलोड करा आयुष्मान कार्ड !

मोबाईलवर 'असे' डाउनलोड करा आयुष्मान कार्ड !

Live Trends News 17 hrs ago

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana योजनेमुळे देशभरातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते.

मात्र अनेकदा आयुष्मान कार्ड नसल्यामुळे रुग्णालयात दाखल होताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता ही प्रक्रिया अधिक सोपी झाली असून नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर अवघ्या दोन मिनिटांत आयुष्मान कार्ड डाउनलोड करता येणार आहे.

आयुष्मान कार्ड हे डिजिटल आरोग्य कार्ड म्हणून काम करते. या कार्डच्या माध्यमातून सरकारी तसेच सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार घेता येतात. त्यामुळे उपचारासाठी आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते. पात्र लाभार्थ्यांचे नाव यादीत असल्यास कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आयुष्मान भारत लाभार्थी पोर्टल या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर 'लाभार्थी' हा पर्याय निवडून मोबाईल क्रमांक टाकावा आणि ओटीपीद्वारे लॉगिन करावे. पुढे राज्य, जिल्हा आणि PMJAY योजना निवडल्यानंतर आधार क्रमांक किंवा फॅमिली आयडी भरावा. स्क्रीनवर कुटुंबातील सदस्यांची नावे दिसतील. संबंधित सदस्याच्या नावासमोरील 'डाउनलोड' पर्यायावर क्लिक करून आधार ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण केल्यानंतर कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येते.

या योजनेत विविध गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयातील उपचारांचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचारासाठी रुग्णांना रोख पैसे देण्याची गरज पडत नाही. त्यामुळे गरजेच्या वेळी आर्थिक मदत आणि तातडीने उपचार मिळवण्यासाठी आयुष्मान कार्ड अत्यंत उपयोगी ठरत आहे.

सरकारकडून नागरिकांना वेळोवेळी डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून आता मोबाईलवर काही मिनिटांत आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे कार्ड आर्थिकदृष्ट्या मोठा आधार ठरू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News