Thursday, 21 Jan, 9.49 am Live Trends News

होम
प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यात "किसान तिरंगा रॅली व रेल रोको आंदोलन

पाचोरा, प्रतिनिधी । भारतीय संविधान बचाव सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे शेतकऱ्यांच्या हितासंबंधी विविध मागण्यांसाठी "किसान तिरंगा रॅली व रेल रोको आंदोलन २६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.

दिल्लीतील किसान मोर्च्याच्या जन समर्थनार्थ व शेतकऱ्यांविरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करावे या मागण्यांसाठी मंगळवार दि. २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता भारतीय संविधान बचाव सेना राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पिपल्स रिपब्लिकन पार्टीसह १० विविध संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)सह जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, वरणगाव, निंभोरा, बोदवड, रावेर, सावदा, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव अशा १० रेल्वे स्थानकांवर "किसान तिरंगा रॅली" व रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती जगन सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना निवेदनाद्वारे दिली आहे. निवेदनावर भारतीय संविधान बचाव सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, ठाणे- डोंबिवली पी.आर.पी. प्रमुख संदिप निकुंभ, ठाणे जिल्हा प्रमुख देवेंद्र लोखंडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख (पी.आर.पी.) राकेश बग्गन, रावेर तालुका पी. आर.पी. प्रमुख चंदु पेहलवान यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर आंदोलनात जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगनभाई सोनवणे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष खंडु सोनवणेसह पदाधिकारी यांनी केले आहे.

Prev Post

अर्णव गोस्वामीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Next Post

अल्पवयीन मुलीचा विवाह ; बालविकास प्रकल्य अधिकारी यांची तक्रार , पोलीसात गुन्हा दाखल

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News
Top