Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रावेरमध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त GNRFचा सेवाभावी उपक्रम ; मोफत वैद्यकीय शिबिरात ४५० नागरिकांची तपासणी

रावेरमध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त GNRFचा सेवाभावी उपक्रम ; मोफत वैद्यकीय शिबिरात ४५० नागरिकांची तपासणी

Live Trends News 1 week ago

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ या पवित्र प्रसंगाचे औचित्य साधून दावत-ए-इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज़ रिलीफ फाउंडेशन) तर्फे रावेर शहरात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

२५ ऑगस्ट २०२६ रोजी अझमीर क्लिनिक, बिलाल मशिदीजवळ, बंडू चौक येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ४५० नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन रावेर शहराचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी GNRFच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक आणि जनसेवेच्या उपक्रमांचे कौतुक केले. समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सातत्याने व्यसनमुक्ती आणि जनजागृतीचे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले. सामाजिक संस्थांनी आरोग्यसेवेसोबतच युवकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

शिबिरात नागरिकांसाठी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये डोळ्यांची व दातांची तपासणी, ECG, रक्तातील साखर, रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी यासह आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजू रुग्णांना डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात आला तसेच आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने दिवसभर आरोग्य तपासणीसाठी गर्दी झाली होती. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी मोफत तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपयुक्त ठरली. एकाच ठिकाणी विविध प्राथमिक आरोग्य तपासण्या उपलब्ध झाल्याने नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.

या जनसेवा उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दावत-ए-इस्लामीचे नाशिक डिव्हिजन अध्यक्ष हाजी अब्दुल सत्तार, जळगाव जिल्हा अध्यक्ष जुबैर अत्तारी, शोएब अत्तारी, शाहिद मदनी, कामिल रजवी, हाजी इस्माईल, मुबारक भाई, मुस्तकीम शेख, आसिफ भाई, डॉक्टर वसीम, सय्यद असगर, सौद मेंबर, अब्दुल समद भाई, अब्दुल खालिद भाई तसेच GNRFचे जिल्हा निरीक्षक रफीक रोशन कादरी यांच्यासह पदाधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष योगदान दिले. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने धार्मिक उत्सवासोबत सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. भविष्यातही समाजातील गरजू लोकांपर्यंत आरोग्यसेवा आणि इतर सामाजिक उपक्रम पोहोचविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News