Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सावद्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन !

सावद्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन !

Live Trends News 1 week ago

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावदा नगरपरिषद कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेविका सिमरन राजेश वानखेडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत समाजसेवा व जनकल्याणासाठी कार्य करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. त्यांच्या न्यायप्रिय, लोकहितवादी आणि दूरदृष्टीच्या कारभाराची आठवण उपस्थितांनी यावेळी करून दिली.

मात्र, या महत्त्वपूर्ण दिनाचे औचित्य असतानाही काही पदाधिकारी आणि संबंधितांना या कार्यक्रमाचा विसर पडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सावदा परिसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत असून, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या लोककल्याणकारी राज्यकर्तीच्या जयंतीप्रसंगी अधिक व्यापक सहभाग अपेक्षित असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News