Dailyhunt
शेरी गावात सती अनुसया माता यात्रोत्सव उत्साहात

शेरी गावात सती अनुसया माता यात्रोत्सव उत्साहात

Live Trends News 3 weeks ago

रणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील शेरी गावात प्राचीन १२ व्या शतकातील सती अनुसया मातेचा यात्रोत्सव चैत्र वद्य पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवार, 3, एप्रिल राेजी पार पडला.

या यात्रेला परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावत श्रद्धा व्यक्त केली, तर पारंपरिक कार्यक्रमांनी संपूर्ण गाव उत्साहाने दुमदुमून गेले.

या यात्रोत्सवात पारंपरिक बारागाडा ओढण्याचा मान युवराज गायकवाड यांना मिळाला. त्यांच्या सोबत राहुल पाटील आणि विक्की बेलदार यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या पारंपरिक विधीने यात्रेचे आकर्षण अधिक वाढले आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्याचा आनंद घेतला.

यात्रेनिमित्त बजरंगबली ध्वजाची भव्य मिरवणूक बँडच्या ठेक्यात काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील तरुणांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरण निर्माण केले. जयघोष, ढोल-ताशे आणि बँडच्या निनादात संपूर्ण गावात उत्सवाची धामधूम पाहायला मिळाली.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचाही रंगतदार मेळा पाहायला मिळाला. क्रांती

सोनवणे (दोनगावकर) यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या तमाशा कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देत पारंपरिक कलांचा आस्वाद घेतला.

ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा यात्रोत्सव अत्यंत यशस्वीपणे पार पडला. सर्वांनी मिळून केलेल्या नियोजन आणि सहकार्यामुळे शेरी गावात एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News