Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेताच्या रस्त्यावरून वाद; आईसह दोन मुलांवर प्राणघातक हल्ला

शेताच्या रस्त्यावरून वाद; आईसह दोन मुलांवर प्राणघातक हल्ला

Live Trends News 2 weeks ago

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील रस्ता वापराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्ध शेतकरी महिलेच्या दोन मुलांवर काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील आभोडा बुद्रुक शिवारात घडली आहे.

याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित्राबाई लक्ष्मण महाजन (वय ६५, रा. रसलपूर, ता. रावेर, जि. जळगाव) यांनी २७ मे रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास आभोडा बुद्रुक शिवारातील शेताच्या रस्त्यावर हा वाद झाला. रस्ता वापरण्याच्या कारणावरून संशयित आरोपी गोपाल सोनजी महाजन, दीपक गोपाल महाजन (दोन्ही रा. रसलपूर) आणि जितेंद्र दांडगे (रा. रावेर) यांनी फिर्यादी सुमित्राबाई यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर गोपाल महाजन याने सुमित्राबाई यांच्या डाव्या खांद्यावर मारले. आईला वाचवण्यासाठी आणि आरोपीच्या हातातील काठी पकडण्यासाठी त्यांचा मुलगा विजय गेला असता, संशयित आरोपींनी त्याच्या डोक्यात व पाठीवर काठीने बेदम मारहाण केली. यावेळी दुसरा मुलगा निलेश हा भावाला सोडवण्यासाठी गेला असता, जितेंद्र दांडगे याने त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले आ दीपक महाजन याने त्याला चापटबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News