Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

Live Trends News 3 days ago

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बांधकाम आणि घरेलू कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू), जळगावच्या वतीने शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जळगाव येथील खूबचंद सागरमल विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात बांधकाम व घरेलू कामगारांच्या विद्यार्थी पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, सिटूचे कामगार नेते कॉ. विजय पवार, कॉ. रावसाहेब धोबी, कॉ. विजय कोळी, घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकारी कॉ. आशाबाई महाजन, कॉ. निर्मला भावसार, कॉ. संगीता भावसार तसेच खूबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रमुख अतिथी अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, मोबाईलचा मर्यादित आणि विधायक वापर करून ज्ञानवृद्धीवर भर द्यावा तसेच मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सिटूचे कामगार नेते कॉ. विजय पवार यांनी बांधकाम व घरेलू कामगारांच्या मुलांना पहिली ते दहावी तसेच उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती आणि विविध सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यासाठी घरेलू कामगार संघटना आणि बांधकाम कामगार संघटना, जळगाव यांच्याशी संपर्क साधण्याचे त्यांनी सुचविले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या स्थापनेसाठी सिटूने सातत्याने संघर्ष केल्याचेही त्यांनी नमूद केले. या शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रमासाठी वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संघटना (MSMRA) तसेच लाकूडपेठ, शिवाजीनगर येथील व्यावसायिक शैलेशभाई पटेल आणि शंकरभाई पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षिका कल्पना देवरे, करुणा महाले, सुनिता येवले तसेच शिक्षक संतोष चौधरी, अजय पाटील आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिटूचे कामगार नेते कॉ. विजय पवार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News