Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टाकरखेडा येथील कुटुंबाचा करूण अंत : चौघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ !

टाकरखेडा येथील कुटुंबाचा करूण अंत : चौघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ !

Live Trends News 2 weeks ago

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा येथील पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह टोकाचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचा करूण अंत झाला असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत दुसरीला असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेल्याचे समजते. यानंतर त्यांनी धावत्या रेल्वेत झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे प्रशासनाला याची माहिती मिळाली.

घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , विजय भोई ,योगेश बागुल , राहुल पाटील याना पंचनाम्यासाठी पाठवले. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News