Friday, 24 Sep, 12.00 pm लोकमंथन

मुंबई ठाणे
अहंकार सोडून विशेष अधिवेशन बोलवा. मनसेच्या आमदारांची मागणी

प्रतिनिधी : मुंबई

महाराष्ट्रात सतत घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरुन विरोधीपक्ष असलेल्या भाजपने आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी ठाकरे सरकारने केली आहे.

विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीला मनसेनेही समर्थन केले आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी तशी मागणी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने (MVA) आपला अहंकार बाजूला ठेवून विशेष अधिवेशन बोलावावे अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

एकापाठोपाठ एक झालेल्या पुणे, अमरावती, पालघर, नागपूर आणि साकीनाका बलात्काराच्या घटना उघडकीस आल्यानंतर डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी गॅंगरेप केल्याची घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे.

प्रगत राज्य समजले जाणाऱ्या महाराष्ट्रात जर महिलेला तिच्या सुरक्षतेतची हमी नसेल तर इतर मागास राज्यात आणि महाराष्ट्रात फरक तो काय?

जर इतके कायदे करून सुद्धा अशा घटना वारंवार घडत असतील तर सरकारने स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून आत्मचिंतन करण्याबरोबरच, विरोधी पक्षांसोबत या विषयावर चर्चा करायला हवी.

राज्यपालांना केलीत तशी टोलवाटोलवी चालणार नाही. शक्ती कायदा पारीत करण्यासाठी आतातरी विशेष अधिवेशन बोलवा,

अशी मागणी करत या राज्य सरकारच्या काळात महाराष्ट्र पोलीस सगळ्यात जास्त बदनाम झाल्याची टीकाही राजू पाटील यांनी केली आहे.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan
Top