Dailyhunt
अंजनापूर येथील शिबिरात २४० रुग्णांची तपासणी

अंजनापूर येथील शिबिरात २४० रुग्णांची तपासणी

कोपरगाव शहर : तालुक्यातील अंजनापूर येथे हनुमान जयंती व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात २४० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. एस.जे.एस. व तुलसी आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हनुमान मंदिर प्रांगणात गुरुवारी (दि.

२ एप्रिल) हे शिबिर पार पडले.

दानशूर व्यक्तिमत्व बाळासाहेब गव्हाणे पाटील तसेच दत्तात्रय गोवर्धन गव्हाणे व रोहिदास साहेबराव गव्हाणे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नेत्र तपासणीसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली.

यावेळी १६७ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर ३४ रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी संबंधित रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, आरोग्यदूत बाळासाहेब गव्हाणे पाटील यांच्या वतीने अंजनापूर व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी नव्या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर यांच्या हस्ते या ॲम्बुलन्सचे उद्घाटन झाले. ही सेवा अंजनापूर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. या कार्यक्रमास ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan