Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

पाथर्डी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड कडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत प्रथम क्रमांक शिरसे मारिया भीमराव (75.50%), द्वितीय डीसले गणेश नवनाथ (73.67%), तृतीय क्रमांक पवार महेश अण्णासाहेब ( 70.17%) यांनी मिळवला.

वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक इंगळे वेदांत महेश (67.83%) द्वितीय चव्हाण गणेश विष्णू (61.00% ) आणि तृतीय काळोखे कृष्णा अण्णासाहेब (60.17%) यांनी मिळवला. विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक तुवर आरुष राजेंद्र (85.17%), द्वितीय लांडे आयुष भाऊसाहेब (84.67%) तर तृतीय हिरवे क्षितिज सुधीर (80.17%) तर एचएससी होकेशनल शाखेत प्रथम क्रमांक चव्हाण ज्योती नवनाथ (60.67%), द्वितीय गायके मीरा हरिश्चंद्र (57.00%) तृतीय अंबाडे आप्पासाहेब बाबा (52.17%) यांनी मिळविला.

या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी डॉ. भाऊसाहेब लांडे, प्रा. राजेंद्र तुवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सलीम शेख, सूत्रसंचालन प्रा. सुरेखा चेमटे, तर आभार प्रा. देवेंद्र कराड यांनी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan