बीजिंग : शियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी इराण युद्ध, युक्रेन संकट, ऊर्जा सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
जिनपिंग यांनी बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पीपलबाहेर पुतिन यांचे स्वागत केले. चर्चेच्या सुरुवातीला पुतिन म्हणाले की, बाह्य दबावांना न जुमानता दोन्ही देशांचे आर्थिक आणि सामरिक संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. तर जिनपिंग यांनीही रशियासोबतचे संबंध दृढ असल्याचे सांगितले.

