Dailyhunt
डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांचा सम्राट कनिष्क राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांचा सम्राट कनिष्क राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

.संभाजीनगर : बोधीगया येथील महाबोधी महाविहाराच्या परिसरात भगवान बुद्धांच्या 2570 व्या बुद्ध जयंती महोत्सवाच्या पवित्र प्रसंगी, 'डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट संसद' आणि 'महाबोधी चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे संबोधी अकादमी, महाराष्ट्रचे अध्यक्ष समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना सम्राट कनिष्क राष्ट्रीय पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

हा मानाचा पुरस्कार पूज्य भदंत हर्षबोधी महाथेरो व पूज्य भदंत प्रियपाल महाथेरो यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या मंगलमय प्रसंगी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. प्रोंचाई पालवधम्मो, डॉ. सिस्टर मिथिला चौधरी, सिस्टर तुम (थायलंड), प्रा. गौतम (दिल्ली), राहुल डंबाळे (पुणे), आयु. भीमराव वायवळ (परभणी), अ‍ॅड. भुक्तरे (हिंगोली) तसेच इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. जागतिक शांततेचे केंद्र बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या परिसरातील प्राचीन, ऐतिहासिक बोधी वृक्षाच्या छायेत आयोजित करण्यात आलेल्या विविध देशातून आपल्या 3000 भिक्खूना महासंघदान देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आपली भूमिका व्यक्त करताना डॉ. भीमराव हत्तीअंबिरे म्हणाले की, जगामध्ये सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती अत्यंत क्लेशदायक आहे. 21 व्या शतकामध्ये माणसाने युद्ध करणे हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे ही युद्धे जर थांबवायची असतील तर जागतिक शांततेचा केंद्रबिंदू बुद्धगयेला ठरवून भगवान गौतम बुद्धाचे विचार सर्वसामान्य पर्यंत रुजवण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न व्हावे. अशी भूमिका मांडली. याप्रसंगी महाबोधी विहाराच्या परिसरामध्ये बुद्ध जयंती अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी भारत सरकार व बिहार सरकार यांच्याशी समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी त्यांनी नमूद केले. तसेच हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. हर्षबोधी महाथेरो यांना त्यांच्या वतीने संघदान करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan