Wednesday, 15 Sep, 12.59 pm लोकमंथन

आंतरराष्ट्रीय
Do Not Touch My Clothes' अफगाणी महिला असं का म्हणत आहेत?

अट्टन किंवा अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय नृत्यादरम्यान परिधान करण्यासाठी असलेला लांब आणि घेरदार स्कर्ट यांचा त्यात समावेश दिसतो. अफगाणिस्तानच्या ज्या भागातील या महिला असतील त्यानुसार काही महिलांनी एम्ब्रॉयडरी केलेल्या टोप्या तर काहींनी डोक्यावर भरपूर कलाकुसर केलेले हेडपीस वापरल्याचे आपल्याला दिसते. अफगाणिस्तानात गेल्या 20 वर्षांपासून महिला कॉलेजमध्ये जाताना किंवा कामाला जाताना अशाच प्रकारचे कपडे परिधान करून जात होत्या. कधी कधी पुढे ट्राऊझरऐवजी जीन्स आल्या तर काही वेळा स्कार्फ खांद्यावर न राहता, डोक्यावर बांधण्यात आला.

पण गेल्या काही दिवसांत तालिबानला पाठिंबा दर्शवण्यासाठी समोर आलेल्या महिलांचे फोटो हे याच्या अगदी विरोधी चित्र दर्शवणारे आहेत. यात महिला लांब पूर्ण काळा बुरखा परिधान केलेल्या असून त्यात त्यांचा चेहरा आणि हातही झाकलेले दिसत आहेत. तालिबानच्या समर्थनार्थ काबुलमध्ये या महिला समोर आल्या होत्या.
अफगाणिस्तानातील अमेरिकन विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या माजी प्राध्यापिका डॉ. बहार जलाली यांनी सोशल मीडियावर पारंपरिक कपडे परिधान करण्याचा हक्क परत मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यांनी त्यासाठी #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture असे हॅशटॅग वापरले आहेत. या मोहिमेत जगभरातील अफगाण महिला सहभागी होत आहेत.

'अफगाणिस्तानची ओळख आणि सार्वभौमत्वावर हल्ला होत असून, ती सर्वात मोठी चिंता असल्यामुळं, या मोहिमेला सुरुवात केल्याचं, जलाली यांनी म्हटलं आहे.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan
Top