Dailyhunt
जयपूरमध्ये परदेशी पर्यटक महिलेशी गैरवर्तन

जयपूरमध्ये परदेशी पर्यटक महिलेशी गैरवर्तन

यपूर : शहरातील आमेर परिसरात एका परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही महिला जपान येथून राजस्थान भ्रमंतीसाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रविवारी सकाळच्या सुमारास जयगड किल्ला परिसर पाहण्यासाठी गेली होती.

किल्ल्याजवळील टेकडीवरील मार्गाने ती गणेश मंदिराच्या दिशेने जात असताना काही तरुणांनी तिचा पाठलाग केला. निर्जन भागात महिला एकटी असल्याचे पाहून पाच जणांनी तिला घेरल्याचा आरोप आहे. त्यांनी तिच्याशी अशोभनीय वर्तन करत छेडछाड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील दृश्यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan