Dailyhunt
जुना मोंढा ते नविन पूलदरम्यान अतिक्रमणांवर कारवाई

जुना मोंढा ते नविन पूलदरम्यान अतिक्रमणांवर कारवाई

नांदेड : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत जुना मोंढा टॉवर ते नविन पूल परिसरातील अतिक्रमणे हटवली.

या कारवाईत रस्त्याच्या दुतर्फा उभारलेले हातगाडे, फ्लेक्स, लोखंडी शेड व वाढीव बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. सुमारे 25 ते 30 अतिक्रमणधारकांवर कारवाई करत 4 ट्रक माल जप्त करण्यात आला. तसेच एका अतिक्रमणधारकास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जुना मोंढा हा गजबजलेला व्यापारी भाग असल्याने अतिक्रमणामुळे वाहतुकीस व रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत होता.

वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. ही मोहीम पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात पार पडली. यात महापालिकेचे सुमारे 30 व पोलीस विभागाचे 20 कर्मचारी सहभागी होते. महानगरपालिकेने नागरिक व व्यापार्‍यांना रस्त्यावर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan