बीड : बीड शहरातील कटकटपुरा-बुंदलपुरा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. नगरसेवक शेख बिलाल यांच्या पुढाकारातून नवीन सहा इंची पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या यशस्वी कामानंतर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक शेख बिलाल यांचा जल्लोषात सत्कार केला.
या कामाच्या शुभारंभप्रसंगी मोसीन चाचू, इनायत खान, बाबाखान, नाजीम खान, आयुब खान, मुबारक चाऊस, आलीम खान, शेख बाबू, शेख अमान, शेख जाहीर, अमर चाऊस आणि शेख शोहेब यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
कटकटपुरा-बुंदलपुरा भागात गेल्या दहा वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक शेख बिलाल यांनी नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन सहा इंची पाईपलाईन मंजूर करून घेतली. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व नियमित झाला असून हजारो नागरिकांना याचा थेट लाभ मिळाला आहे.
The post कटकटपुरा-बुंदलपुरा भागातील पाणीटंचाई दूर; नगरसेवक शेख बिलाल यांचा जल्लोषात सत्कार appeared first on Lokmanthan | लोकमंथन.

