Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या यावर्षीच्या बारावी बोर्ड परीक्षेत के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत कोपरगाव परिसरासह जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९५% निकाल लागला असून या शाखेत सायली योगेश वदक ही ७९% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. तसेच रुपेश वाल्मीक वाणी हा ७७.५०% तर भक्ती संदीप इंगळे ही ७४.३३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.

वाणिज्य शाखेचा ८६% निकाल लागला असून वाणिज्य शाखेत विनीत नितीन आढाव हा ९०.३३% गुण मिळवून प्रथम आला आहे. तसेच कु. वेदांती गजेंद्र आदमाने ही ८५.८३% तर कु. रितिका रवींद्र देशमुख ही ८५.३३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहे.

कला शाखेचा ६७% निकाल लागला असून शाखेत खतिजा मोयद्दिन शेख ही ८१% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. तसेच साक्षी बाबुराव खंडागळे ही ७७.५०% तर दिव्या नितीन तांबे ही ७७% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.

विद्यार्थ्यानी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी सर्वच गुणवंत विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan