Sunday, 15 Sep, 11.43 am लोकमंथन

राष्ट्रीय
महात्मा गांधींच्या पुतळ्याची उत्तर प्रदेशामध्ये विटंबना

लखनऊ
उत्तर प्रदेशातील जालोनमधील गांधी इंटर कॉलेजमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेनंतर निरनिराळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महात्मा गांधी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा आणि समाजकंटकांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
गाधी इंटर कॉलेजचे प्राचार्य रवी कुमार अग्रवाल यांनी याप्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली. आपण जेव्हा महाविद्यालयात पोहोचलो, तेव्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याचे शीर हे जमिनीवर पडल्याचे आढळले. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधींचा पुतळाही नीट करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सतीश कुमार यांनी दिली. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यानंतर आता महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. रात्रीच्या अंधारात लपून महापुरूषांचा अपमान करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून त्यांच्या महानतेचा एक अंशही तुम्ही कमी करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan
Top