Dailyhunt
मोदी यांच्यासमोरच भडकल्या ममता ;संतापाने भाषणच टाळले

मोदी यांच्यासमोरच भडकल्या ममता ;संतापाने भाषणच टाळले

कोलकात्ताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख...

कोलकात्ताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री भडकल्या व त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. उपस्थित नागरिकांमधून ममता यांच्या भाषणाअगोदर जय श्रीरामचे नारे देण्यात आल्याने, ममता बॅनर्जी संतप्त झाल्याचे दिसून आले.

या वेळी ममता म्हणाल्या, की मला वाटते की शासकीय कार्यक्रमास का


ही प्रतिष्ठा असावी. हा शासकीय कार्यक्रम आहे.
एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. मी तर पंतप्रधान मोदी व सांस्कृतिक मंत्रालयाची आभारी आहे, की तुम्ही कोलकात्यात कार्यक्रमाचे आयोजन केले; परंतु एखाद्यास आमंत्रित करून, निमंत्रित करून त्याचा अपमान करणे हे तुम्हाला शोभत नाही. याचा निषेध म्हणून मी येथे काहीच बोलणार नाही. जय हिंद, जय बंगाल.. असे म्हणून त्या भाषणास नकार देत जागेवर जाऊन बसल्या.

या वेळी ममता म्हणाल्या, की मला वाटते की शासकीय कार्यक्रमास का


ही प्रतिष्ठा असावी. हा शासकीय कार्यक्रम आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. मी तर पंतप्रधान मोदी व सांस्कृतिक मंत्रालयाची आभारी आहे, की तुम्ही कोलकात्यात कार्यक्रमाचे आयोजन केले; परंतु एखाद्यास आमंत्रित करून, निमंत्रित करून त्याचा अपमान करणे हे तुम्हाला शोभत नाही. याचा निषेध म्हणून मी येथे काहीच बोलणार नाही. जय हिंद, जय बंगाल.. असे म्हणून त्या भाषणास नकार देत जागेवर जाऊन बसल्या.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan