Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकमध्ये घटसर्प आजाराने २ चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली

नाशिकमध्ये घटसर्प आजाराने २ चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात दोन चिमुकल्यांचा घटसर्प (Diphtheria) आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावात वास्तव्यास असलेल्या एका राजस्थानी कुटुंबातील ही दोन बालके असल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे सरकारकडून घटसर्प हा आजार जवळपास संपल्याचा दावा केला जात आहे, तसेच दुसरीकडे लसीकरणावरही मोठा खर्च होत असताना दोन निष्पाप बालकांचा यामुळे मृत्यू होतो, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर मात्र आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan