menu
लोकमंथनहोम

प्रा. आशालता कांबळे यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

8 November 2017, 2:36 am

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) : सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाईच्या स्मरणार्थ परिवर्तनाची चळवळ, साहित्य व क ला या क्षेत्रात मौलिक योगदान देणार्‍या महिलांच्या गौरवार्थ देण्यात येणार्‍या या पुरस्कारासाठी फुले-आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या व लेखिका प्रा. आशालता कांबळे, मुंबई यांची निवड केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना अगोदरच्या रविवारी 3 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पाच हजार रुपयांचा धनादेश व स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Loading...

No Internet connection

Link Copied