Sunday, 24 Jan, 5.43 pm लोकमंथन

होम
पुणे शहरातील ५ वी ते ८ वीच्या शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू

पुणे : राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता पालिकेनेही शहरातील शाळा सुरू करण्यास हिरवा कंदी...

पुणे : राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता पालिकेनेही शहरातील शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या शाळा सुरू होणार आहेत. याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला.शाळा सुरू करण्याआधी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

यासोबतच थर्मामीटर, थर्मल गन, ऑक्सिमिटर, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हन आदी वाहनांचे निर्जंतुकीकरण नियमित होण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. वर्गखोल्या तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमानुसार असावी. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कच्या वापरासंदर्भात मार्गदर्शकसूचना असणारे फलक लावणे आवश्यक असून शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहताना मुलांमध्ये किमान ६ फुट अंतर राखावे लागणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan
Top