Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सागर बेग यांना पोलीस संरक्षणाची मागणीशेवगावात सकल हिंदू समाजाचे पोलिस ठाण्यात निवेदन

सागर बेग यांना पोलीस संरक्षणाची मागणीशेवगावात सकल हिंदू समाजाचे पोलिस ठाण्यात निवेदन

शेवगाव : हिंदू धर्मरक्षक सागर बेग व आकाश बेग यांच्या जीवितास गंभीर धोका असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांना तातडीने सशस्त्र पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये निवेदने सादर करण्यात येत आहेत.याच पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज, शेवगाव शहर व तालुक्याच्या वतीने सोमवारी (दि.

२९) शेवगाव पोलिस ठाण्यात औपचारिक निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे सागर बेग व आकाश बेग यांना त्वरित सशस्त्र पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती पोलीस सुरक्षा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

The post सागर बेग यांना पोलीस संरक्षणाची मागणीशेवगावात सकल हिंदू समाजाचे पोलिस ठाण्यात निवेदन appeared first on Lokmanthan | लोकमंथन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan