जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला, ज्यात एका भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला पाठीमागून धडक दिल्याने ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला . कडवंची परिसरात साफसफाईचे काम संपवून वाहनात बसत असताना हा अपघात झाला.
या अपघातात १०-१२ मजूर जखमी झाले असून, त्यांना जालन्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
