Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात : आमदार रोहित पवार

शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात : आमदार रोहित पवार

पुणे: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटले की, 'एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.

काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार संपर्कात आहेत. 2029 च्या निवडणुकांच्या आधी सगळं समोर येईल. जवळपास 40 च्या आसपास आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.'
रोहित पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता आगामी काळात पुन्हा राजकीय भूकंप पहायला तर मिळणार नाही ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत. कारण याआधीही राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलाढाली पहायला मिळाल्या होत्या, त्यामुळे रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळाले आहेत.
आ.रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना इतरही मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित पवार यांनी म्हटले की, 'दादा जाऊन 4 महिने झाले. दादांच्या अपघाताच्या तपासासाठी अधिवेशनात स्मरण पत्र द्यावं लागलं. अजित पवार आणि आमची एकच इच्छा असल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली होती. दादा गेल्यामुळे चर्चा थांबली. दादांच्या विमानाचा अपघात झाला ते खासगी विमान होतं. उद्या आणखी कोणत्या नेत्याचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खासगी विमानांबाबत ठोस कायदा झाला पाहिजे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan