गांधीनगर : वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकार्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. समितीचे 39 सदस्य तीन दिवसांसाठी गुजरात दौर्यावर आहेत.जेपीसी सदस्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतली.
वन नेशन-वन इलेक्शनसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्षपद वकील पीपी चौधरी भूषवत आहेत. यात एकूण 39 सदस्य आहेत, ज्यामध्ये 27 लोकसभा खासदार आणि 12 राज्यसभा खासदारांचा समावेश आहे.

