लोकशाही न्यूज नेटवर्क
वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झालं आहे. IAS तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव बीडच्या ताडसोना या मूळगावी नेण्यात येणार आहे.
आसराबाई यांच्या पार्थिवावर ३ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तुकाराम मुंढे हे सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या कर्तव्यावर आहे. तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई यांचं वय जवळपास शंभरच्या आसपास होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाल्याने प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आसराबाई मुंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आहे.
आईच्या निधनाची वार्ता कळताच तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालमधून तातडीने पुण्यात निघाले. त्यांच्या आईच्या पार्थिवावर ताडसोना गावात उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले जातील. आसराबाई यांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि ग्रामस्थ उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तत्पूर्वी, प्रशासकीय सेवेत अतिशय शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या मागील २१ वर्षात २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता ते मंत्रालयात सचिव म्हणून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तसेच महसूल आणि वन विभागाचे कामकाज पाहणार आहेत.

