Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अजून किती दिवस 'गुंगी गुडीया' बनून राहतील?

अजून किती दिवस 'गुंगी गुडीया' बनून राहतील?

लोकशाही न्यूज नेटवर्क

हाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाचा मोठा भडका उडाला आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेचा संदर्भ देत महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडीया’ असा केल्याने सत्ताधारी महायुतीने यावर अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया (X / ट्विटर) अकाउंटवरून सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना “सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडीया’ बनून राहतील?” असा सवाल करण्यात आला आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने ही टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फोनवरून प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या या टीकेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी काँग्रेसने याबद्दल तात्काळ माफी मागावी आणि ते पोस्ट मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की, बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देऊन झाल्यानंतर वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्यामुळे त्यांनी बोलणे थांबवले होते; मात्र काँग्रेसने त्या व्हिडिओचा विपर्यास करून टीका केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसकडून सोशल मीडियावर बीडमधील एका पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलण्यापासून थांबवताना दिसत असल्याचा दावा केला गेला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांचा थेट ‘गुंगी गुडीया’ असा उल्लेख केला. काँग्रेसच्या या पोस्टमुळे महाराष्ट्रातील राजकरण तापले आहे.

काँग्रेसच्या या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. साम टीव्हीशी बोलताना मिटकरी यांनी काँग्रेसने केलेल्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेसने महिला उपमुख्यमंत्र्यांचा असा अपमान करणे अत्यंत चुकीचे आहे. या वक्तव्याबद्दल काँग्रेसने तात्काळ माफी मागितली पाहिजे,” अशी जोरदार मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live