Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बांदल-इब्राहिम पटेल यांच्यात मनपा सभागृहात गदारोळ!

बांदल-इब्राहिम पटेल यांच्यात मनपा सभागृहात गदारोळ!

लोकशाही संपादकीय लेख

काल जळगाव महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शहराच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आली होती. या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी महिलांबाबत काही शब्द बोलल्याबद्दल भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांनी त्यांना माईक मागितला.

माईक मागण्यावरून त्यांचा काहीसा गैरसमज झाला. तेव्हा विजय बांदल हे इब्राहिम पटेल यांच्यावर धावून गेले. हा वाद वाढत गेला. सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

तो वाद पाहून महापौर दीपमाला काळे यांनी या दोघांना पंधरा मिनिटांसाठी सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा ते दोघे सभागृहातून बाहेर पडले आणि सभागृहातील नेते नितीन लढ्ढा यांच्या दालनात गेले. जोरजोरात एकमेकांवर ओरडणे सुरू झाले. तेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक शरद तायडे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि इतर तीन-चार लोक उपस्थित होते.

त्या ठिकाणी एकमेकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला गेला; पण तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही. नितीन लढ्ढा यांच्या दालनात हा गदारोळ जवळजवळ अर्धा तास सुरू होता. परंतु त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विजय बांदल म्हणाले की, इब्राहिम पटेल हे काही माझे शत्रू नाहीत; पण त्यांनी महिलांविषयी जे वक्तव्य करायला नको होते, ते केले म्हणून मला त्यांची चीड आली. माझी त्यांच्याशी बाचाबाची झाली. परंतु त्यानंतर सभागृहात दोघेही परतले आणि निषेध व्यक्त करून इब्राहिम पटेल यांनी सभात्याग केला, हे विशेष होय. विजय बांदल आणि इब्राहिम पटेल यांच्यातील या किरकोळ वादाचा प्रकार गदारोळात झाला, त्याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. विकासाच्या संदर्भात काही बोलण्याऐवजी इतर गोष्टी करण्यातच त्यांना रस आहे, म्हणून सर्वांचीच एक प्रकारे करमणूक झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live