Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चारचाकीसह ५.१७ लाखांचा गुटखा जप्त

चारचाकीसह ५.१७ लाखांचा गुटखा जप्त

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्थानिक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर, महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधित पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या इनोव्हा गाडीसह एकास ताब्यात घेवून चारचाकीसह ५.

१७ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून परिसरातून गुटखा हद्दपार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेशानुसार वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मुक्ताईनगर भुसावळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर गुटखा व सुगंधी पानमसाला विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा सुगावा लागला. त्याची शहानिशा करून पोलीस पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने संबधीत स्थळी सापळा रचला व संशयित सिल्व्हर रंगाची एमएच -२० बीडी -३००० क्र. ची इनोव्हा कार थांबविली व ​तीची तपासणी केली असता त्या गाडीत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली.

पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून पंचनामा पूर्ण केला. यावेळी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८ वर्ष, रा. खालची आळी, नशिराबाद, जि. जळगाव) यास मुद्देमाल वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार, असा एकूण रु. ५, १७, ८६८/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन अन्न प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ पोलीस पथकांमध्ये स पो नि अमितकुमार बागुल उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलीस कर्मचारी भुषण माळी, सुकराम सावकारे, प्रशांत ठाकुर, गोपी सोनवणे, मनोज मस्के, यासीन पिंजारी, विजय बाविस्कर, ईश्वर तायडे यांचा समावेश होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live