Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुचाकीच्या धडकेत वीज कंपनीचा कर्मचारी जखमी

दुचाकीच्या धडकेत वीज कंपनीचा कर्मचारी जखमी

भुसावळ - भरधाव दुचाकीने उडवल्याने शहरातील वीज कंपनीतील कर्मचारी जखमी झाले. हा अपघात गत महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी भुसावळ तहसील कार्यालयासमोर घडला. अपघात प्रकरण अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष दत्तात्रय सोनार (50, गजानन महाराज नगर, कोळी हॉलमागे, प्लॉट नंबर 20, भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गत महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी ते दुचाकी (एम.एच.19 क्यू.5285) वरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेला अज्ञात दुचाकीस्वार (एम.एच.19-7632) ने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जोरदार धडक दिल्याने सोनार हे जखमी झाले व त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाी कॉन्स्टेबल सुबोध मोरे करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live