Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

लोकशाही न्यूज नेटवर्क

हाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन काळे फासण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासले.

राज्यात अगोदरच एमपीएससीविरोधात वातावरण तापलेले आहे. अनेक प्रमुख शहरांत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा घेऊन गेले. अशावेळी ही घटना घडली. त्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोठा इशाराही दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

'ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है', असा गर्भित इशारा संतोष शिंदे यांनी दिला. आता फक्त आयोगाच्या सचिवाला काळे फासले आहे. पुढे आयोगाच्या अध्यक्षालाही काळे फासू, असा इशारा शिंदे यांनी दिला. प्रेमासाठी पेपर फोडला जातोय. कशासाठी पेपर फोडला जातोय? आयोगाचे अध्यक्ष आणि सरकारचे काय लागेबांधे आहेत, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार निष्क्रिय ठरलेले आहे. निवेदन, आंदोलन करून गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला काही फरक पडत नाही. मुख्यमंत्री नुसत्या बैठकांच्या शिदोऱ्या हाणत आहेत. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आयोगाच्या सचिवांच्या तोंडाला काळे फासले, हे फार चांगले केले. आता जर सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर पुढचा नंबर आयोगाच्या अध्यक्षांचा असेल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. संभाजी ब्रिगेड यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

परीक्षा पेपरफुटी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. काही वेळापूर्वी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फासली होती. त्यानंतर तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास बेलापूर पोलीस करत असल्याची माहिती नवी मुंबईचे डीसीपी अमित काळे यांनी दिली.

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते काल सचिवांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी चर्चा केली. यानंतर काही कागदपत्रे दाखवायची आहेत, यासाठी आजची वेळ घेतली. आज परत एकदा सचिवांना भेटले. यावेळी मोबाईलमध्ये कागदपत्रे असल्याचे सांगून मोबाईल घेऊन सचिवांच्या कार्यालयात गेले. यावेळी पुस्तक देण्याच्या बहाण्याने सचिवांच्या जवळ जात काळी शाई त्यांच्या अंगावर टाकण्यात आली. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एमपीएससी कार्यालयात प्रवेश देण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live