Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गृहमंत्री म्हणून पेलेट गन वापरण्याची परवानगी तुम्हीच दिली का?

गृहमंत्री म्हणून पेलेट गन वापरण्याची परवानगी तुम्हीच दिली का?

लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला आणि पेलेट गन चालवण्याचा आदेश नेमका कोणी दिला? असा थेट सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून विचारलाय.

आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि हिंसक कारवाईनंतर दिल्लीतील राजकारण पेटले आहे. शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर सुरक्षा दलांनी केलेल्या अमानुष बळाचा निषेध करत, “गृहमंत्री म्हणून पेलेट गन वापरण्याची परवानगी तुम्हीच दिली होती का?” असा थेट हल्लाबोल राहुल गांधींनी पत्राद्वारे केला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना मारण्याचे आदेश कोणी दिले? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. राहुल म्हणाले की, विद्यार्थी योग्य शिक्षण व्यवस्थेची मागणी करत होते, परंतु सुरक्षा दलांनी त्यांच्यावर बळाचा वापर केला. आंदोलकांचे संरक्षण करणे आणि संवादाद्वारे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अशा क्रूर कृत्यांमुळे लोकशाही शिष्टाचाराची पायमल्ली होते .

गृहमंत्री असताना तुम्ही विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती का? असा थेट सवाल राहुल गांधींनी अमित शाह यांना पत्रातून विचारलाय. राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले आहे की, विद्यार्थी एका निष्पक्ष आणि उत्तरदायी शिक्षण प्रणालीची मागणी करत होते. पण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर अंदाधुंद बळाचा वापर करण्यात आला. या कारवाईत शेकडो विद्यार्थी जखमी झाले आणि विद्यार्थिनींचाही छळ झाला.

प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर दिसणारी छायाचित्रे गंभीर दुखापती असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी हरियाणातील १९ वर्षीय विद्यार्थी साहिल लोचाब याचे उदाहरण दिले. पेलेट गनने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका आहे. राहुल गांधी यांनी गृहमंत्रींना दोन थेट प्रश्न विचारले आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्याची परवानगी दिली होती का? नसेल तर हा आदेश कोणी दिला? विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करताना दिसलेले साध्या वेशातील लोक कोण होते, ते पोलीस होते की स्वयंसेवक? आणि त्यांना कोणाच्या आदेशावरून तैनात करण्यात आले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live