Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक : रुग्णवाहिका नाकारल्याने बाळ पोटातच..

हृदयद्रावक : रुग्णवाहिका नाकारल्याने बाळ पोटातच..

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. सदर महिला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिचं बाळ पोटातचं दगावल्याची माहिती समोर आली आहे.

या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशानाणे डीझेल नसल्याच कारण देत गरोदर मातेला रुग्ण वाहिका नाकारली होती. प्रायव्हेट वाहिकेतुन हिंगीलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले, मात्र उशीरा पोचल्याने आईच्या पोटात बाळ दगावल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे एकच खळबळ माजली असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

आमच्या पेशंटला रुग्णालयात हलवायचं होतं. आम्ही 850 चं डिझेल टाकून स्वत: गाडी केली आणि तिला इथे घेऊन आलो. मग हिंगोलीतल्या रुग्णालयात ॲडमिट केलं. पण तोपर्यंत उशीर झाला. कारण इथे आल्यावर आम्हाला डॉक्टर म्हणाले, ताई तुम्ही जर लौकर आला असतात तर तुमचं बाळ वाचू शकलं असतं. पण तुम्हाला (यायला ) वेळ लागल्यामुळे बाळ वाचलं नाही, असं त्यांनी सांगितल्याचं, महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं. आम्ही येणारचहोतो पण अँब्युलन्सला डिझेल नव्हतं, त्यामुळे अँब्युलन्स आम्हाला इथे घेऊन आली नसल्याचं नातेवाईकांनी त्यांना सांगितलं.

सरकार जबाबदार : टीकास्त्र

दरम्यान या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या हत्येसाठी सरकार जबाबदार आहे, असं म्हणावं लागेल. कारण कुठेही इंधन तुटवडा नाही अशा घोषणा सरकारकडून केल्या जातात, अशा वेळेस हिंगोलीमध्ये ही घटना घडली आहे. फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन मिळालं नाही, म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live