Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांत १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. या कालावधीत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचे संकेत आहेत.

काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

जळगाव वेदरच्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसासोबतच वीज आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसरासह परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या भागांत पावसासह वादळी हवामानाची शक्यता आहे. १२ सप्टेंबर रोजी धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या भागांत पावसाच्या सरींसह काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

'यलो अलर्ट' असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवावे. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या परिसरात जाणे टाळावे तसेच झाडे, विजेचे खांब आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live