Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

लोकशाही संपादकीय लेख

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यास दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, माझ्यासह ५० लोक आझाद मैदानावर उपोषणाला बसतील. माझ्यासोबत एक रुग्णवाहिका आणि दोन गाड्या असतील. रस्त्यात माझी प्रकृती बिघडल्यास उपचारासाठी रुग्णवाहिकेचा उपयोग होईल, तर माझ्या वाहनात काही बिघाड झाल्यास दुसऱ्या वाहनाचा वापर करता येईल. मात्र, काहीही झाले तरी १९ तारखेला आझाद मैदानावर जाणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांच्या याचिकेची दखल घेतली आहे. शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन होत असेल आणि त्यातून सार्वजनिक हिताला बाधा येत नसेल, तर त्यासंदर्भात न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईत मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करताना, प्रत्येकाने मुंबईला आलेच पाहिजे असे नाही, असेही सांगितले. तुमच्याकडे असलेले पैसे मुंबईतील खर्चासाठी राखून ठेवा; मी एकटाही मुंबईला जाण्यास समर्थ आहे, असे ते म्हणाले.

आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यानंतर पुढे काय होईल, ते पाहू. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोणतीही परिस्थिती आली तरी ती सहन करण्यास आपण तयार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यांत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आज अंतरवाली सराटी येथून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी राहणार आहेत. उपोषणाचा सतरावा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live