लोकशाही संपादकीय लेख
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 30 मे रोजी रखरखत्या उन्हात अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले, पण एक दिवसातच उपोषण सुटले. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड या दोन मंत्र्यांनी केलेली मध्यस्थी फळाला आली.
मध्यरात्री उपोषण पाणी देऊन सोडण्यात आले. ज्या ज्या मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन दिवसात शासन निर्णय घेतला जाईल, असे वाटाघाटीत ठरले. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले. काल रात्री दहा वाजता रखरखत्या उन्हात बाज टाकून त्या बाजेवर जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले होते.
माझ्या अंगाची लाही लाही होऊ माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण मी आता आर या पारची लढाई करतो आहे. असे जरांगे पाटलांनी ठासून सांगितले होते. त्यानुसार उघड्या मैदानावर 45 अंश तापमानात ते उपोषणाला बसले होते. माझा जीव हा महत्त्वाचा नाही, पण मराठा समाजाची लेकरं महत्त्वाची आहे.
त्यांच्या आरक्षणासाठी मी हा काहीही करायला तयार आहे. दिवसभर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे उपोषण स्थळी जरांगे पाटलांशी वाटाघाटी करत होते. ते अगदी मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी चालल्या. अखेर ती पूर्ण झाली आणि एकदाचे उपोषण सुटले.
काल जरांगे पाटलांचे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. धनगर समाजानेही जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. उपोषण सुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संपूर्ण मीडियासमोर आमचे हे आश्वासन आहे झाकून लपून काही करण्याचा प्रश्नच येत नाही. एकंदरीत उपोषण तर सुटले, पण मागण्या मान्य नाही झाल्या की पुन्हा उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनोज रंगे पाटील यांनी दिला आहे..!

