जामनेर | प्रतिनिधी
शहरातील जळगांव रोडवरील आय.टी.आय. कॉलनी जवळ कपाशीने भरलेला ट्रक उलटुन भीषण अपघातात १ जण ठार तर ८जण जखमी झाल्याची घटना घडली . सविस्तर वृत्त असे कपाशी ने पुर्ण भरलेला ट्रक क्रमांक MH 28 B 9754 हा ट्रकच्या आत व टपावर कपाशी भरणारे मजुर घेऊनकी शहराकडे येत असतांना दुचाकीस्वाराला वाचवित असतांना ट्रक उलटला त्यातील मजुर हे बाहेर फेकले गेले .
