Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

डक सुरक्षा व्यवस्था असलेल्या जिल्हा कारागृहातून खळबळजनक घटना घढली असून कारागृहाच्या एका बंदिस्त बराकीतच जुन्या वादाच्या कारणावरून दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

या वादादरम्यान एका कैद्याला जबरदस्तीने भिंतीवर ढकलून देण्यात आले, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, हल्ला करणाऱ्या कैद्याविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही हिंसक घटना दि. 26 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहातील बराक क्रमांक 8 मध्ये घडली. 29 वर्षीय पीडित कैदी (रा. वाल्मीक नगर, जळगाव) हा आपल्या बराकीत असताना, तिथेच बंदिस्त असलेला आरोपी कैदी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून अचानक त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद काही वेळातच एवढा विकोपाला गेला की, आरोपी श्याम सूर्यवंशी याने पीडित कैद्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीदरम्यान आरोपीने पीडित कैद्याला जोरदार धक्काबुक्की करत थेट बराकीच्या भिंतीवर ढकलून दिले. कडक भिंतीवर डोके आदळल्यामुळे पीडित कैदी रक्ताळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.

या गोंधळानंतर कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यानंतर आरोपीने पीडित कैद्याला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. कारागृहात घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर, पीडित कैद्याच्या तक्रारीवरून जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी कैदी श्याम तुकाराम सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारे कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याने पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live