Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धडक कारवाई

कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धडक कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क

ळगाव शहरातील निमखेडी रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, संबंधित संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमखेडी रस्त्यावरील ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान फ्लॅटमधून दोन महिलांची सुटका करण्यात आली. तपासात सागर गुलाब सोनवणे (वय २७, रा. चोरगाव, ता. धरणगाव) व एका महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live