Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केमिकल टँकरचा भीषण अपघात : दोन ठार!

केमिकल टँकरचा भीषण अपघात : दोन ठार!

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरने सबगव्हाण टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर व क्लिनर या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, रात्री पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. यात केमीकलच्या टँकरने दिलेली धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर टँकरचा टायर फुटून अचानक आग लागली. या दुर्दैवी घटनेत टँकरमधील ड्रायव्हर व क्लिनर दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाच्या जवानांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून टँकरला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

अपघातग्रस्त टँकर (क्रमांक जीजे-18 बीव्ही-8315) हा गुजरातहून ओडिशाच्या दिशेने जात होता. या टँकरमध्ये 'टोल्युइन डायआइसोसायनेट' नावाचे अत्यंत ज्वलनशील आणि क्रियाशील केमिकल होते. या केमिकलचा वापर प्रामुख्याने फोम, कोटिंग्ज आणि चिकटवणारे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. सुदैवाने, आग लागूनही टँकरमधील हे केमिकल सुरक्षित राहिले, ज्यामुळे एक मोठी रासायनिक दुर्घटना टळली आहे.

केमिकल टँकरचा अपघात झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली होती. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे सबगव्हाण टोलनाक्याजवळ सुमारे अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live