पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
खताचे ट्रॅक्टर शेतात घेवुन जात असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोहटार ता. पाचोरा येथे घडली आहे.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील सागर दिलीप पाटील (वय – २२ वर्ष) हा तरुण शेतकरी २४ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात खताचे ट्रॅक्टर घेवुन जात असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने या अपघातात सागर पाटील हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे श्रेणी पो. उ. नि. सुनिल पाटील, पांडुरंग सोनवणे हे रुग्णवाहिका चालक भागवत पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिस व ग्रामस्थांनी सागर पाटील यास पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात आणल्यानंतर उपचार सुरू असतांनाच सागर पाटील याचा मृत्यू झाला.
सागर पाटील हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सागर पाटील हा अविवाहित असुन त्याचे पाश्चात्य वृद्ध आई, एक बहिण असा परिवार असुन तो पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांचा पुतण्या होता. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास श्रेणी पो. उ. नि. पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

