किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील किनगाव-डांभुर्णी रस्त्यावर अवैध गौणखनिज (वाळू) वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
किनगाव ते डांभुर्णी जाणाऱ्या रस्त्यावरील पाचपीर बाबा दर्गाजवळ विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून अवैध वाळूची वाहतूक सुरू होती. याची गुप्त माहिती मिळताच यावल पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. ट्रॅक्टर चालक विजय मधुकर साळुंखे (रा. कोळन्हावी, ता. यावल याच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली; मात्र त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना आढळला नाही.
हवालदार हितेश बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

